रत्नागिरी (जमीर खलफे) : जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरीच्या वतीने ०१ ऑगस्ट रोजी 'महसूल दिन' अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या, विशेष प्रसंगी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेत कार्यरत असलेले महसूल सहायक अजित सदानंद पिलणकर यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. सन २०२५-२६ या महसुली वर्षामध्ये महसुली कामकाज अधिक गतिमान करणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि उत्कृष्ट सेवा देऊन शासनाची प्रतिमा उंचावण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
पिलणकर यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन 'महसूल दिनाचे' औचित्य साधून त्यांना विशेष सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले. "हा सन्मान आपला व आपल्या कार्यकर्तृत्वाचा..." अशा शब्दांत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल (भा.प्र.से.) यांनी त्यांचे अभिनंदन केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, नायब तहसीलदार दीपक चव्हाण व कार्यालयातील सहकारी कर्मचारी यांनीही अजित पिलणकर यांचे अभिनंदन केले. या गौरव सोहळ्यामुळे महसूल विभागातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.