loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबोली मान्सुन मॅरेथॉन २०२६ ची जय्यत तयारी; उद्या २ ऑगस्ट रोजी सकाळी विशाल परब यांच्या हस्ते होणार शुभारंभ

सावंतवाडी (प्रतिनिधी): सह्याद्री ॲडव्हेंचर व रेस्क्यु टीम (आंबोली-सांगेली) आणि सायकलींग असोसिएशन आयोजित तसेच विशाल सेवा फाउंडेशन प्रायोजित 'आंबोली मान्सुन मॅरेथॉन २०२६' चे आयोजन उद्या, रविवार दि.२ ऑगस्ट रोजी करण्यात आले असून याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. ​उद्या रविवारी सकाळी ७:३० वाजता भाजपा युवानेते व विशाल सेवा फाउंडेशनचे संस्थापक विशाल परब यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनचा भव्य शुभारंभ होणार आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा १८ किलोमीटर, १० किलोमीटर आणि ५ किलोमीटर अशा तीन वेगवेगळ्या टप्प्यांत पार पडणार आहे. राज्यभरातून व जिल्ह्यातून सुमारे एक हजार स्पर्धक यात सहभागी होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून, या निमित्ताने आंबोलीत पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी ही मान्सुन मॅरेथॉन अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास विशाल परब यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, स्वतः विशाल परब आणि त्यांच्या पत्नी वेदिका परब या स्पर्धेत प्रत्यक्ष धावणार आहेत. या क्रीडा सोहळ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी व स्पर्धकांनी सहभागी व्हावे, तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विशाल परब यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg