रत्नागिरी(जमीर खलफे)- मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली हातीस ग्रामविकास मंडळाने पावसाचे पाणी साठविण्यासाठी फेरोसिमेंट तंत्रज्ञान वापरून पंधरा हजार लिटरची टाकी उभारली आहे. केवळ आठ दिवसांत उभ्या राहिलेल्या या टाकीच्या बांधकामाचा प्रारंभ जलवर्धिनी प्रतिष्ठानचे उल्हास परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली समारंभपूर्वक झाला. पीर बाबरशेख मंदिरात झालेल्या या समारंभात बोलताना परांजपे यांनी पावसाचे पाणी साठविण्याची आवश्यकता आणि उपाय याविषयी माहिती दिली. पाण्याचे विविधांगी उपयोग परांजपे यांनी विशद केले.
शेतीसाठी तसेच पिण्यासाठीही पावसाच्या साठवलेल्या पाण्याचा उपयोग कसा होऊ शकतो, हे त्यांनी उदाहरणांसह पटवून दिले. त्यांनी या बाबत इतंभूत माहिती दिली. मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर यांनी पिण्याबरोबरच आंब्याच्या बागांना पाण्याची टंचाई कशी भेडसावते हे विशद केले. आंब्याच्या बागा डोंगरावर असल्यामुळे तेथे पाणी नेणे अत्यंत गैरसोयीचे होते. पाण्याअभावी पुरेसे उत्पन्न मिळू शकत नाही. हातीसचा संपूर्ण भाग आंबा बागायतीसाठीच प्रसिद्ध आहे. डोंगरावरच टाक्या बांधून साठवलेले पावसाचे पाणी डोंगरावरच्या बागांना दिले गेले तर सुरुवातीला काही प्रमाणात खर्च आला तरी नंतरच्या काळात कोणत्याही खर्चाशिवाय बागायतदारांना नव्या कलमांच्या वाढीसाठी तसेच औषधांच्या फवारणीसाठी पाणी मिळू शकते. त्याचा फायदा त्यांनी घेतला पाहिजे. उभारण्यात आलेल्या टाकीमध्ये साठविलेल्या पाण्याचा उपयोगत उरुसाच्या काळात देवस्थानासाठी होणार आहे. या टाकीपासून प्रेरणा घेऊन गावातील आणि परिसरातील लोक पाणी साठविण्यासाठी प्रवृत्ती होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पंचायत समिती सदस्य कांचन नागवेकर यांनी पावसाचे पाणी साठवण्याची ही कल्पना अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांशी चर्चा करून पाणी साठवण्याकरिता शेतकर्यांना अनुदान स्वरूपात काही देता येईल का, याचा आपण अवश्य विचार करू, अशी ग्वाही त्यांनी समारंभात दिली. समारंभात पत्रकार प्रमोद कोनकर, भारत शिक्षण मंडळ (पटवर्धन हायस्कूल) संस्थेचे विनायक हातखंबकर, सदस्य संतोष कुष्टे, माजी अध्यक्ष विजय (बबन) नागवेकर, सेक्रेटरी जयवंत नागवेकर, टेंभ्ये हातीस ग्रुप ग्रामपंचायत सदस्या सौ. राधिका राजेंद्र नागवेकर, मुंबई मंडळाचे कार्याध्यक्ष संदीप (मुन्ना) नागवेकर, महिला बचत गट अध्यक्ष सौ. नीता (नानी) नागवेकर, मंडळाचे विद्यमान पदाधिकारी आणि गावातील तसेच परिसरातील गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.