loader
Breaking News
Breaking News
Foto

मोलकरणीने साथीदारासह सहा लाखांचा ऐवज चोरल्याच्या संशयातून गुन्हा दाखल

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - चिपळूण तालुक्यातील कळमुंडी येथील हनुमानवाडी परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, घरातील मोलकरीण व तिच्या साथीदाराने मिळून सुमारे ५ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा ऐवज व रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुयोग संतोष बेलवलकर (वय ३०, व्यवसाय हॉटेल, रा. कळमुंडी, हनुमानवाडी, ता. चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या फिर्यादीनुसार, ३१ जुलै रोजी सकाळी ५ ते १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.०४ या कालावधीत अज्ञातपणे घर बंद असताना आरोपींनी घराच्या दर्शनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५ लाख ८८ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी मोलकरीण दिपीका दिलीप बोबले (वय ४०, रा. आवेरीवाडी, कळमुंडी, ता. चिपळूण) तसेच गणेश काशिराम गोरीवले (वय ३१, रा. कळमुंडी, ता. चिपळूण) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) व ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक २२४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

चोरीस गेलेल्या ऐवजात मंगळसूत्र, कानातील दागिने, सोन्याची चेन, ब्रेसलेट, पेंडंट, अंगठ्या, सोन्याची नाणी, नथ, सोन्याचे मणी तसेच १८ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

कळमुंडी हनुमानवाडी परिसरात घरफोडी

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg