loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुका तेली समाज महिला समितीच्या प्रमुखपदी रिया राऊत (नरवण) यांची निवड

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ, गुहागर अंतर्गत गुहागर तालुका तेली समाज महिला समितीच्या प्रमुखपदी रिया राजेंद्र राऊत (नरवण) यांची निवड करण्यात आली. महिला समितीची बैठक शृंगारतळी येथे पार पडली. या बैठकीमध्ये समिती पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या समितीच्या उपाध्यक्षपदी रुणाली रविंद्र रहाटे (पालपेणे), सचिव पदी अदिती मिनार झगडे (असगोली), सहसचिव दिव्या दीपक किर्वे (वरवेली), खजिनदार पदी सायली सुधीर राणे (वाघांबे), तर सह खजिनदारपदी रेश्मा निलेश रसाळ (वरवेली), तर सदस्य पदी रोहिणी मनोहर रहाटे (पालपेणे), शर्मिला श्याम रहाटे (जानवळे), अपर्णा अनंत राऊत (पाटपन्हाळे) यांची निवड करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

निवड झालेल्या सर्व पदाधिकार्‍यांचे गुहागर तालुका तेली समाज महिला समितीचे वतीने सत्कार करण्यात आला. गुहागर तालुका तेली समाजसेवा संघाच्या वतीने नूतन महिला समिती पदाधिकारी यांना पुढील समाजाच्या कामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg