loader
Breaking News
Breaking News
Foto

नवीन क्रीडा पोर्टलच्या तांत्रिक त्रुटी दूर करण्याची आणि जुने पोर्टल सुरू ठेवण्याची मागणी; सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हा क्रीडाधिकार्‍यांना निवेदन

मालवण(प्रतिनिधी)- क्रीडा विषयक नवीन पोर्टल पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत जुने पोर्टल सुरू ठेवण्यात यावे आणि शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात यावी या आणि विविध मागण्यांचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय मधुकर शिंदे, कार्याध्यक्ष विजय तातोबा मागाडे आणि सचिव नंदकिशोर गजानन नाईक यांच्या स्वाक्षरीने जिल्हा क्रीडाधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्य क्रीडा विभागामार्फत शालेय क्रीडा स्पर्धांसाठी सुरू करण्यात आलेल्या नवीन ऑनलाइन पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे शारीरिक शिक्षण शिक्षकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांना एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवीन पोर्टलवर खेळाडूंची नोंदणी, माहिती भरणे व अद्ययावत करताना येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी, नवीन प्रणाली पूर्णपणे त्रुटीमुक्त होईपर्यंत जुने पोर्टलही कार्यरत ठेवावे, नवीन क्रीडा पोर्टलवर सध्या येत असलेल्या विविध तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्यात याव्यात. जिल्ह्यातील सर्व शारीरिक शिक्षण शिक्षकांसाठी तालुका व जिल्हा स्तरावर प्रत्यक्ष (ऑफलाइन/हँड्स-ऑन) प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करावे. पोर्टलसंदर्भातील समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र हेल्पडेस्क किंवा समन्वय अधिकार्‍याची नेमणूक करावी. तांत्रिक कारणांमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी नोंदणीस योग्य ती मुदतवाढ देऊन पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. शालेय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, पोर्टलवरील अडचणींमुळे वेळेत नोंदणी न झाल्यास विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रातील भवितव्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती महासंघाने व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी यावर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg