loader
Breaking News
Breaking News
Foto

अजीजा दाऊद नाईक हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा व वाहतूक जनजागृती' मोहीम उत्साहात संपन्न

​रत्नागिरी, (जमीर खलफे) : आयडियल एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित येथील अजीजा दाऊद नाईक हायस्कूलमध्ये जिल्हा वाहतूक शाखा, रत्नागिरी आणि शाळा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने 'रस्ता सुरक्षा व वाहतूक जनजागृती' मोहिमेचे अत्यंत यशस्वी आयोजन करण्यात आले. शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांची जाणीव निर्माण व्हावी आणि त्यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व ओळखून भविष्यात एक जबाबदार नागरिक म्हणून योगदान द्यावे, या उदात्त उद्देशाने या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. ​या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा वाहतूक शाखेचे हेड कॉन्सस्टेबल सुशांत पवार यांनी सकाळी १०:३० ते १२:३० या वेळेत दोन स्वतंत्र सत्रांमध्ये उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे, अभ्यासू आणि प्रभावी मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात रस्त्यावरून वावरताना आणि वाहने चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे किती अत्यावश्यक आहे, हे त्यांनी सोप्या व रंजक भाषेत पटवून दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम, सिग्नल यंत्रणा यांसारख्या तांत्रिक बाबींसोबतच त्यांनी जबाबदार नागरिकत्व आणि महिला सक्षमीकरण व महिला सुरक्षा यांसारख्या सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विविध पैलूंवर अत्यंत अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी नियमांचे केवळ वाचन न करता ते स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी आचरणात आणावेत, असा पुनरुच्चार त्यांनी केला. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम अजीजा दाऊद नाईक हायस्कूलचे ज्येष्ठ सहाय्यक शिक्षक मुझक्कीर खतीब यांच्या अध्यक्षतेखाली सुरळीत पार पडला. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि ओघवत्या शैलीतील सूत्रसंचालन मैनुद्दीन भैरवाडी यांनी केले. शाळेचे माजी विद्यार्थी आदिल माजगावकर यांनी पुढाकार घेऊन हे अत्यंत गरजेचे आणि स्तुत्य जनजागृती सत्र आयोजित करण्यात मोलाचे सहकार्य केले.

टाईम्स स्पेशल

​कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक समीर गडबडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना थेट प्रात्यक्षिक आणि व्यावहारिक ज्ञान देणारे मार्गदर्शन केल्याबद्दल हेड कॉन्सस्टेबल सुशांत पवार यांचे विशेष आभार मानले. त्याचप्रमाणे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे माजी विद्यार्थी आदिल माजगावकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष मुझक्कीर खतीब, सूत्रसंचालक मैनुद्दीन भैरवाडी तसेच मनापासून परिश्रम घेणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे त्यांनी मनापासून आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg