loader
Breaking News
Breaking News
Foto

दीप एंटरप्रायझेसचे बिपीन पाटणे यांना 'उद्योग भूषण' पुरस्कार

खेड (प्रतिनिधी) - कोकणस्थ (संगमेश्वरी) वैश्य समाजाच्या वतीने देण्यात येणारा 'उद्योग भूषण' पुरस्कार शहरातील दीप एंटरप्रायझेसचे बिपीन पाटणे यांना जाहीर झाला आहे. १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मुंबई-परेल येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात आयोजित कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उद्योग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसह सामाजिक बांधिलकी जपत कार्याचा ठसा उमटवल्याबद्दल त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उद्योग क्षेत्रासह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही पाटणे सक्रियपणे कार्यरत आहेत. रोटरी स्कूलच्या माध्यमातून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी मौलिक योगदान दिले आहे.

टाईम्स स्पेशल

सहकार क्षेत्रातही त्यांनी उठावदार कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांची उद्योग भूषण पुरस्काराची निवड झाली आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याद्दल त्यांचे सर्वच स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg