loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्यानविद्या महाविद्यालय, दापोलीचा सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा

दापोली (प्रतिनिधी) : उद्यानविद्या दापोलीचा सातवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला विद्यापीठाचे शिक्षण संचालक, डॉ. सतिश नारखेडे, संशोधन संचालक डॉ. प्रशंत शहारे, संचालक, विस्तार शिक्षण डॉ. संजय तोरणे, संचालक, क्रिडा व सहशैक्षणीक उपक्रम डॉ. ए. व्ही. माने, सहयोगी अधिष्ठाता निम्नस्तर कृषि शिक्षण डॉ. संतोष वरवडेकर आणि सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय, दापोली डॉ. गार्गी शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उद्यानविद्या महाविद्यालय, दापोलीच्या सातव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शोभिवंत बागकाम व पुष्पप्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये उपलब्ध साहित्याचा वापर करून विविध बागकाम व पुष्परचना सादर करण्यात आली. सदर प्रदर्शन हे परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी खुले ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थी व नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रात डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या स्वामीनाथन सभागृहामध्ये प्रमुख प्रकवत्ते व मार्गदर्शक अविनाश वाघ यांनी विद्यार्थ्यांसाठी 'उच्च शिक्षण भविष्यातील सुवर्ण संधी' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. हा वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहयोगी अधिष्ठाता, डॉ. गार्गी शिर्के, डॉ. प्रफुल्ल माळी, डॉ. राकेश गजभिये, डॉ. नितेश दळवी, डॉ. योगेश परुळेकर, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. सुमेद थोरात, डॉ. योगेश सैतवाल, डॉ. सुनिल घवाले, डॉ. किरण शिगवण, डॉ. आशिष भुवड, स्मिता पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg