loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांच्या माध्यमातून, पारिजात संस्था, मुंबई यांच्या सहकार्याने, शृंगारतळी जिल्हा परिषद गटातील विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे वाटप

वेळणेश्वर(उमेश शिंदे)- गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा, कारूळ येथील इयत्ता पहिली ते सातवीच्या ३१ विद्यार्थ्यांना तसेच जिल्हा परिषद शाळा, विसापूर येथील इयत्ता पहिली ते सातवीच्या १८ विद्यार्थ्यांना शालेय बॅग, प्रत्येक इयत्तेनुसार आवश्यक वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स आदी संपूर्ण शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. शृंगारतळी जिल्हा परिषद गटातील सर्व शाळांना अधिकाधिक सहकार्य करून शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे, हा प्रमोद गांधी यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. याच उद्देशाने त्यांनी स्वतः पुढाकार घेत विविध माध्यमांतून शाळांना आवश्यक मदत व सहकार्य मिळवून देण्याचे काम सुरू ठेवले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष म्हणजे, या शाळांना अवघ्या एका महिन्यात दोन वेळा भेट देण्यात आली. पहिल्या भेटीत शाळांमधील अडचणी, गरजा आणि विद्यार्थ्यांच्या आवश्यक बाबी जाणून घेण्यात आल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज सर्वाधिक महत्त्वाची असल्याचे लक्षात घेऊन पारिजात संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला संपूर्ण शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पालक आणि शिक्षकांनीही या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत प्रमोद गांधी व पारिजात संस्था, मुंबई यांचे आभार व्यक्त केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg