loader
Breaking News
Breaking News
Foto

वाशी तर्फे संगमेश्वर येथील रवींद्र सनगरे यांचे निधन

संगमेश्वर (प्रतिनिधी) - संगमेश्वर तालुक्यातील वाशी तर्फे संगमेश्वर ग्रामपंचायतीचे कर्मचारी रवींद्र सनगरे यांचे दिनांक २ ऑगस्ट रोजी मुंबई येथे उपचार सुरु असताना निधन झाले. रवींद्र सनगरे हे वाशी तर्फे संगमेश्वरमध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. अतिशय सुंदर हस्ताक्षर आणि प्रामाणिकपणा यामुळे गावामध्ये त्यांचा नावलौकिक होता. सरपंच तन्वी गानू यांनी सनगरे यांच्या निधनामुळे आपण चांगल्या कर्मचाऱ्याला हरपलो असून गावाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यावर सोमवारी ३ रोजी वाशी येथे अंत्यविधी करण्यात येईल. त्यांच्या पाठी पत्नी, मुली आणि मुलगा असा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg