loader
Breaking News
Breaking News
Foto

आरवली-माखजन रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील आरवली-माखजन रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे पडले आहेत. विशेषतः कोंडिवरे गावाजवळील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याने रात्रीच्या वेळी खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. कोंडिवरे गावातील मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्यामुळे सध्या तलावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्ता ओळखू येत नाही. त्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बुरंबाड आणि माखजन हद्दीतही रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारक व प्रवासी त्रस्त झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या रस्त्यावरून शाळकरी मुले, रुग्णवाहिका आणि शेतमालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. मात्र ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. छोट्या- मोठ्या अपघातांची भीती कायम असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दुचाकीस्वार अनेकदा घसरून पडत आहेत. काही दिवसांपूर्वी बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले होते. मात्र निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि दर्जाहीन कामामुळे ते खड्डे दोन दिवसातच पुन्हा उखडले. बांधकाम विभागाने केलेल्या कामाचे पितळ यामुळे उघडे पडले आहे.

टाईम्स स्पेशल

"रस्त्याची केवळ मलमपट्टी न करता कायमस्वरूपी डागडुजी करावी. आमच्या जीवाशी खेळू नका," अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली. जर तातडीने रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर सर्वपक्षीय ग्रामस्थ एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg