loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर एसटी स्थानकाची इमारत झाली सुसज्ज पण.... प्रवाशांच्या नशिबी मात्र अजूनही उपेक्षाच!

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - लाखो रुपये खर्चून स्थानकाचा कायापालट झाला असला, तरी मूलभूत सुविधांचा अभाव प्रवाशांना रोजचाच मनस्ताप देत आहे. फलाट सुशोभित झाले, मात्र कोणती बस कोणत्या फलाटावर उभी आहे, याची स्पष्ट माहिती नसल्याने प्रवाशांना आपल्या गावच्या गाड्या शोधण्यासाठी स्थानकभर भटकंती करावी लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, पावसाची सर आली की संगमेश्वर एसटी स्थानकाचे आवार अक्षरशः तलावाचे रूप धारण करते. संभाजीनगर, गणेश हार्डवेअर परिसरातून येणारे पावसाचे पाणी बायपास रस्त्यालगत योग्य गटार व्यवस्था नसल्याने थेट स्थानकाच्या आवारात घुसते. परिणामी ढोपरभर पाणी, चिखल आणि घाण यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. इतकेच नव्हे, तर स्थानकातील महिलांसाठीचे हिरकणी विश्रांतीगृह बंद असल्याने महिला प्रवाशांना बसची वाट पाहत उभेच राहावे लागत आहे. स्थानकातील विद्युत पंखेही बंद असल्याने उकाड्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg