loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्यामुळे तळवडे गावातील विजेचा प्रलंबित प्रश्न मार्गी, ग्रामस्थांमधून समाधान

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यातील तळवडे गावातील बर्‍याच दिवसांचा विजेचा प्रश्न आमदार किरण सामंत यांच्यामुळे मार्गी लागला असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गावामध्ये कमी व्होल्टेजचा गंभीर प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होता. येथील ग्रामस्थांनी विजेचा प्रश्न सोडविण्याची आमदार सामंत यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीची आमदार किरण सांमत यांनी तात्काळ दखल घेऊन ६३ केव्हीचा ट्रान्स्फॉर्मर बदलून त्या ठीकाणी १०० केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्स्फॉर्मर मंजूर करून बसविण्यात आला आहे. यामुळे विजेची समस्या कायमची दूर झाली असुन नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आमदार किरण सामंत यांचे गावकर्‍यांनी मनापासून आभार मानले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg