loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबोलीमध्ये महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे पर्यटन व्यवसाहिक देशोधडीला - आंबोली मा. सरपंच तथा प्रशासक सावित्री पालेकर

आंबोली - आंबोलीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून महावितरण ची 33 kv ची लाईन आंबोली सब स्टेशन ला येते व तिथून पुढे 11 kv ची लाईन आंबोली, गेळे, चौकूळ या तिन्ही गावात जाते व तेथून पुढे प्रत्येक वाडीवर व घरारघरात व हॉटेल व्यावसायिक यांना ट्रान्सफरमर च्या माध्यमातून विधुत पुरवठा केला जातो. आंबोली, गेळे, चौकूळ मध्ये कॉन्टॅक्ट बेस वर कामकरणारे 4 महावितरण चे कर्मचारी आहेत जे सर्व प्रकारचे प्रयत्न विधुत पुरवठा सुरळीत करण्यासाठी करतात मात्र जेव्हा एकाद्या ट्रान्सफरमर काही बिघाड झाला किंवा विधुत वहिनी तुटली तरी त्या ठिकाणी मुख्य विधुत वहिनी बंद करणे किंवा सुरु करणे या साठी जे परमिट आंबोली सब स्टेशन मधून घ्यावे लागते ते कॉन्टॅक्ट बेस वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देता येत नाही व त्या मुळे जे दुरुस्तीचे काम एक तासात करता ते काम करण्यासाठी एक एक दिवस किंवा त्या पेक्षा जास्त कालावधी लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंबोलीमध्ये सद्या मान्सून पर्यटन हंगाम सुरु आहे. मोठया प्रमाणात पर्यटक कर्नाटक, गोवा व इतर राज्ये तसेच महाराष्ट्र भरातून येतात. मात्र हॉटेल्समध्ये light नसल्याने ते सद्या त्यांचे रेसेर्व्हशन कॅन्सल करत आहेत किंवा ज्यांनी वास्त्याव्याला आहेत ते तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. तासन तास light नसल्याने हॉटेलमधील अन्न पदार्थ देखील खराब होत आहेत. या सर्व गोष्टीचा परिणाम प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आंबोलीतील हॉटेल व्यवसाहीकानावर होत आहे. आंबोलीमध्ये जे हॉटेल व्यवसाय उभे राहत आहेत हे येथील व्यवसाहिकांनी स्वतःचे स्वतः उभे केले आहेत. मात्र महावितरणच्या भोंगळ कारभारमुळे आज ते आर्थिक अडचणीत सापडत चालले आहेत.

टाईम्स स्पेशल

आंबोली सरपंच तथा प्रशासक सौ सावित्री पालेकर यांची सध्या च्या वेळेस प्रमुख मागणी आहे की आंबोली, गेळे, चौकूळ मध्ये पर्मनंट वायरमन उपलब्ध व्हावा ज्याला ट्रान्सफरमर किंवा 11 kv च्या विधुत वाहिनीवरील दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक असलेले किमान परमिट तरी भेटेल. या बाबत महावितरण च्या अधिकारी यांच्याकडे मागणी करून सुद्धा त्यांना या बाबत चे गांभीर्य नाही आहे. त्यामुळे आंबोली, गेळे, चौकूळमधील जनता व हॉटेल व्यवसाहिक महावितरणच्या कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. तसेच याबाबत जाब आमसभे ध्ये ही उपस्थित करणार आहे. व जे नुकसान येथील व्यवसाहिकांचे होत आहे त्याची भरपाईचीही मागणी महावितरणकडे करणार आहे. त्यामुळे आंबोली, गेळे,चौकूळ या ठिकाणी त्वरित पर्मनंट वायरमन महावितरणने उपलब्ध कराव.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg