चौक, (अर्जुन कदम) - खालापूर येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज मठात आज गुरुपौर्णिमा निमित्ताने मोठी गर्दी झाली होती. खालापूर या तालुक्याच्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मठाची स्थापना करण्यात आली असून १४ मे २०२६ रोजी विविध धार्मिक विधीने श्री स्वामी समर्थ यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून येथे श्री स्वामी समर्थ भक्तांची रोजच गर्दी वाढत आहे. या मठात तळ मजल्यावर श्री स्वामी समर्थ यांच्या नावाचा जप, ध्यान धारणा केली जाते, तर पहिल्या मजल्यावर श्री स्वामी समर्थ यांची सुंदर मूर्ती स्थापित करण्यात आली आहे.
आज गुरुपौर्णिमा निमित्ताने श्री स्वामी समर्थ महाराज मठात सकाळी काकडा आरती झाल्यावर स्वामींच्या अभिषेकाला सुरुवात झाली. पूजा आरती, प्रसाद संपन्न झाला. यावेळी स्वामी समर्थ भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारी महाप्रसाद देण्यात आला. गुरुपौर्णिमा हा गुरु-शिष्य परंपरेला समर्पित असलेला एक पवित्र सण आहे, जो आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला असल्याने याला 'व्यास पौर्णिमा' असेही म्हणतात. हा सण अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाळला जातो.
गुरूंना वस्त्र, पुष्पहार, श्रीफळ अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. या दिवशी गुरुमंत्राचा जप, ध्यान आणि गरजूंना अन्नदान करणे अतिशय पुण्यकारक मानले जाते. खालापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे, येथे सर्व शासकीय कार्यालये आहेत, शिवाय श्री स्वामी समर्थ महाराज यांचा मठ हा मुख्य रस्त्यावर आहे, त्यामुळे येणारे - जाणारे स्वामी समर्थ भक्त आवर्जून दर्शन घेतात.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.