loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई संचलित प्रभात हायस्कूल शिवतर मध्ये ‘मोफत आरोग्य तपासणी शिबिर’ संपन्न

खेड - जेसीआय खेड, प्राथमिक आरोग्य केंद्र जामगे व उपजिल्हा रुग्णालय कळंबणी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी व ग्रामस्थासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन प्रभात हायस्कूल शिवतर प्रशालेत करण्यात आले. या शिबिराचे आयोजन जेसीआयचे अध्यक्ष शंकर पार्टे साहेब(चाकाळे) यांच्या माध्यमातून करण्यात आले. प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनींना महावीर एजन्सी खेड व शंकर पार्टे यांच्याकडून प्रोटीन डबे व सर्व विद्यार्थ्यांना जेसीआय खेड यांच्याकडून खाऊचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रभात हायस्कूल, शिवतर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (उएज) श्रीराम पालांडे, शाळा समितीचे व्हाइस चेअरमन शिवाजी मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशिनाथ मोरे, शिवतर गावचे सरपंच मंगेश मोरे तसेच सरपंच सुभाष मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी व प्राथमिक आरोग्य केंद्र जामगे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.भुवड, डॉ .चिंधे साहेब, परिचारिका, आरोग्य सेवक लाड, जाधव व येवले, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, प्रभात हायस्कूलचे मुख्याध्यापक काझी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आरोग्य शिबिरामागील मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती करणे, त्यांचे आरोग्य तपासणे, संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देणे तसेच कुपोषण व जीवनसत्त्वांच्या कमतरतेपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करून त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य अधिक सक्षम बनविणे हा होता. तसेच विद्यार्थिनींना ’गुड टच - बॅड टच’ या विषयावर डॉ.भुवड यांनी मार्गदर्शन करून वैयक्तिक सुरक्षितता, जागरूकता आणि योग्य वेळी मदत घेण्याबाबत माहिती देण्यात आली.

टाईम्स स्पेशल

शिबिरादरम्यान उपजिल्हा रुग्णालय कळंबणी व प्राथमिक आरोग्य केंद्र जामगे यांच्या मार्फत सर्व विद्यार्थिनींना मल्टीव्हिटॅमिन, मल्टीमिनरल आणि प्रोटीन पावडरचे वाटप करण्यात आले. तसेच जेसीआय खेड यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपस्थित सर्व मान्यवर, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, शाळेचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि जेसीआय खेड यांच्या सहकार्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg