loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात निकीत वराडकर, विशाल आचरेकर यांची शिवसेनेच्या बीएलए समन्वयकपदी निवड

मालवण (प्रतिनिधी) - शिवसेनेच्या मालवण शहर बीएलए समन्वयकपदी निकीत वराडकर व विशाल आचरेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर वायरी भूतनाथ जिल्हा परिषद बीएलए समन्वयकपदी प्रथमेश प्रकाश डिचवलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीएलए संपर्कप्रमुख काका कुडाळकर यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. मालवण शहरात आमदार निलेश राणे जनसंपर्क कार्यालयामध्ये बीएलएची बैठक कुडाळ मालवण मतदार संघाचे बीएलए संपर्कप्रमुख हेमंत (काका) कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी मालवण शहरप्रमुख तथा उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, नगरसेविका तथा आरोग्य सभापती पुनम चव्हाण, नगरसेवक तथा बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेवक महेश काेयंडे, नगरसेविका अश्विनी कांदळकर, नगरसेविका मेघा कांदळकर, कुडाळ मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, माेहन वराडकर यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg