loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत मोफत करिअर मार्गदर्शन सेमिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी : डीएलआर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ॲण्ड रिक्रृटमेंटच देशातील पहिल मान्यताप्राप्त ट्रेनिंग इन्स्टिट्यूट गोवाकडून सावंतवाडीत मोफत करिअर गायडंन्स सेमीनारचे आयोजन करण्यात आले होते. नवसरणी येथे झालेल्या या सेमीनारला उदंड प्रतिसाद मिळाला. याचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. नवसरणी कॅथोलिक सेंटर सावंतवाडी येथे या सेमीनारचे आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, कॅरल फर्नांडिस या येथील स्थानिक असून गेमींग आणि हॉस्पिटलीटीत करिअर करण्यासाठीची संधी त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय यशाची नवी संधी यातून प्राप्त होणार आहे. गेमींग आणि हॉस्पिटलीटीत करिअर ग्रोथची संधी यानिमित्ताने मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

यावेळी उपस्थितांना या सेमिनारमध्ये गेमींग आणि हॉस्पिटलीटीत करिअरबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, पत्रकार राजू तावडे, मनोज घाटकर, मोटार मालक संघ तालुकाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, माजी नगरसेवक विलास जाधव, सुंदर गावडे, कॅरल फर्नांडिस, कॅंडीडा फर्नांडिस, डीनो फर्नांडिस, संकेत शेट, कल्पेश फुलसुंगे, क्लाइव्ह फर्नांडिस आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg