loader
Breaking News
Breaking News
Foto

युवासेना गुहागर आक्रमक, विद्यार्थ्यांचा हात दिसला तरी एस.टी. थांबली नाही

वेळणेश्वर - युवासेना गुहागर शहरच्या वतीने एस.टी. आगार व्यवस्थापक यांची भेट घेऊन, मिरजोळी स्टॉपवरील प्रकाराबद्दल जाब विचारण्यात आला. दि. ०३/०८/२०२६ रोजी, चिपळूण-गुहागरच्या ७ बसने मिरजोळी स्टॉपवर हात दाखवणार्‍या शालेय विद्यार्थ्यांना न थांबताच पुढे काढले. आगार व्यवस्थापकांना स्पष्ट शब्दात सांगण्यात आले की, भविष्यात अशा पद्धतीचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. जर पुन्हा घडलं, तर शिवसेना आणि युवा सेना एकत्रित येऊन या बेजबाबदार एस.टी. चालकांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यापुढे विद्यार्थ्यांवर होणारा निष्काळजीपणा अजिबात सहन केला जाणार नाही! यावेळी गुहागर शहर युवासेना शहरप्रमुख राज विखारे, शिवसेना ग्राहक कक्ष तालुकाप्रमुख आदेश मोरे, युवासेना उपशहरप्रमुख सोहम सातार्डेकर, विभाग प्रमुख समीर कनगुटकर, वार्ड क्र.७ चे शाखाप्रमुख कल्पेश बागकर, युवासेना विभागप्रमुख सुजल होळब, युवासेना शाखाधिकारी आर्यन पाटील, युवासैनिक सुयोग गोयथळे आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg