loader
Breaking News
Breaking News
Foto

भुईबावडा सिमेवाडी ग्रामस्थांच्या मालकी जमीनीतून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता पण मागणीकडे दुर्लक्ष

वैभववाडी (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ऐनारी फाटा ते ऐनारी असा ३ किलोमीटरचा डांबरीकरणाचा रस्ता करण्यात आला. हा रस्ता भुईबावडा सिमेवाडी येथील ग्रामस्थांच्या मालकीच्या जमिनीतून गेला असून, रस्ता कामादरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार येथे तातडीने संरक्षण भिंत, गटार व पायर्‍या बांधण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी सिमेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामस्थांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, रस्ता डांबरीकरणापूर्वी मुंबई मंत्रालयातून आलेल्या सर्व्हेअरनी या ठिकाणी संरक्षण भिंत बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्ष काम करताना केवळ एकाच ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात आली असून उर्वरित भाग तसाच सोडण्यात आला आहे. ज्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने जमीन तोडण्यात आली आहे, ती जमीन भात लागवडीखालील आहे. सध्या संरक्षण भिंतीअभावी ही जमीन खचून ढासळत असल्याने भातशेतीचे मोठे नुकसान होत आहे.

टाईम्स स्पेशल

त्याचप्रमाणे सिमेवाडी ग्रामस्थांच्या घराकडे जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला गटार मारण्यात आलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी थेट परिसरात पसरत आहे. तसेच बाजूला पायर्‍या बांधून देण्याचे आश्वासनही अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यानंतर संबंधित विभागाने या ठिकाणी तत्काळ संरक्षण भिंत, गटार आणि पायर्‍यांचे बांधकाम पूर्ण करून ग्रामस्थांची समस्या सोडवावी, अशी मागणी भुईबावडा सिमेवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg