संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - चिपळूण तालुक्यातील नायशी, कळंबुशी व वडेरु पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, नायशी संचलित ह.भ.प. आ. बा.सावंत माध्यमिक विद्यालय, नायशी शिक्षणप्रेमी व समाजाभिमुख देणगीदारांच्या उदार सहकार्याने उभारण्यात आलेल्या दोन सुसज्ज वर्गखोल्या आणि चार संगणकांनी युक्त आधुनिक संगणक कक्षाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी पंचक्रोशीत ज्ञानाचा प्रकाश घराघरापर्यंत पोहोचविणारे, विद्यालयाचे आश्रयदाते व महान विठ्ठलभक्त ह.भ.प. आत्माराम बापूजी सावंत यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण विद्यालयाचे हितचिंतक व देणगीदार निलेश निर्मला मारुतीराव घाग व सर्व देणगीदार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी कृतज्ञतेने त्यांना अभिवादन केले.यानंतर स्वखर्चातून विद्यालयासाठी उभारण्यात आलेल्या वर्गखोल्या व संगणक कक्षाचे उद्घाटन प्रत्येक वर्गातील एक विद्यार्थी एक विद्यार्थिनी तसेच देणगीदारांच्या परिवारातील उपस्थित व्यक्तींच्या हस्ते करून समाजाला एक प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
कै. मारुतीराव श्रीपत घाग, कै. निर्मला मारुती घाग व कै. सौ. श्रद्धा निलेश घाग यांच्या पवित्र स्मरणार्थ, निलेश मारुतीराव घाग, नितीन मारुतीराव घाग व गायत्री नितीन घाग यांनी एक सुसज्ज वर्गखोली विद्यालयाला अर्पण केली. तसेच कै. रामचंद्र विष्णू घाग व कै. सौ. उषा रामचंद्र घाग यांच्या स्मरणार्थ हेमंत रामचंद्र घाग व नेत्रा हेमंत घाग यांनी आणखी एक आधुनिक वर्गखोली बांधून विद्यालयाच्या सेवेत समर्पित केली. कै. कमळाकर धोंडू सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे सुपुत्र सचिन कमळाकर सावंत, राधिका सचिन सावंत तसेच सुपुत्री स्मिता अरुण पांचाळ यांनी चार संगणकांसह सुसज्ज संगणक कक्ष उभारून डिजिटल शिक्षणाला बळकटी दिली. त्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची दारे खुली झाली आहेत. उदघाटनानंतर विद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात संस्थेतर्फे सर्व देणगीदारांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मनोगत व्यक्त करताना निलेश घाग यांनी अत्यंत भावनिक शब्दांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. "गोरगरिबांच्या मुलांनी शिक्षणाच्या बळावर मोठी स्वप्ने पाहावीत, प्रामाणिक परिश्रमातून यश मिळवून आपल्या पंचक्रोशीचे नाव राज्यभर व देशभर उज्ज्वल करावे. समाजाने आम्हाला दिलेले हे ऋण अशाच समाजसेवेतून फेडावे," असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या शब्दांनी विद्यार्थी, पालक आणि उपस्थितांच्या मनाला भावनिकतेचा स्पर्श केला. नितीन घाग यांनीही शिक्षण हीच खरी संपत्ती असल्याचे सांगत, समाजाने शिक्षणासाठी सदैव पुढे यावे आणि विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करावे, असे प्रतिपादन केले. दुर्गेश घाग यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांना योग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगितले. समाजोपयोगी कार्यात प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. माजी संचालक विलास चव्हाण यांनी देणगीदारांचे मनःपूर्वक आभार मानताना, "पात्राला दिलेले दान हेच सर्वश्रेष्ठ दान असते. या उदार देणगीदारांनी विद्यालयाला केवळ इमारती दिल्या नाहीत, तर असंख्य विद्यार्थ्यांच्या भवितव्याला नवी दिशा दिली आहे," असे गौरवोद्गार काढले. तर प्रवीण कांबळे यांनी स्वखर्चातून विद्यालयाला दिलेल्या दातृत्वाचे आभार आपल्या मनोगत व्यक्त केले.














1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.