रत्नागिरी, : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आयोजित "रोटरी फ्रेंडशिप रन-२०२६" फ्रेंडशिप डे निमित्त उत्साहात संपन्न झाली. मुलींना गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणाऱ्या एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन व धावस्पर्धेला हिरवा झेंडा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, जिल्हा कार्यक्रम प्रमुख (महिला बाल विकास) मलिनाथ कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, जिल्हा माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे, जिल्हा क्रीडा अधिकारी शिंदे तसेच नगरसेविका मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत दाखविण्यात आला.
स्पर्धेत ४०० हून अधिक धावपटूंनी ३ व ५ कि.मी. गटांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आरोग्य, मैत्री आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. कार्यक्रमापूर्वी झुंबा प्रशिक्षिका अंकिता पाटकर यांनी झुंबा सत्र घेऊन सहभागींचा उत्साह वाढविला. यावेळी वैदेही रानडे यांनी एचपीव्ही लस सुरक्षित, प्रभावी व फायदेशीर असल्याचे सांगून ९ ते १४ वर्षे व १४ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुलींनी लसीकरण करून घ्यावे तसेच पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता जवळच्या आरोग्य केंद्रात मुलींना लस द्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख संयोजक रोटे. सागर बसणकर व राधा बसणकर यांच्यासह रोटे. अमर आयरे, रोटे. प्रदीप साळुंखे, सिताराम सावंत, विनायक निकम, रोटे. दादा कदम, रोटे. डॉ. केतनकुमार चौधरी, रोटे. डॉ. वामन सावंत, कोकण कोस्टल मॅरेथॉन ग्रुप, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन, स्वयंसेवक, प्रायोजक व विविध शासकीय विभागांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी असिस्टंट गव्हर्नर रोटे. अविनाश पालशेतकर यांनी उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष डॉ. संदीप करे यांनी उपस्थित मान्यवर, सहभागी, स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानत, रोटरी फ्रेंडशिप रन हा एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती करणारा प्रभावी सामाजिक उपक्रम असल्याचे सांगितले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.