loader
Breaking News
Breaking News
Foto

बळीराजासाठी एक दिवस' उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीचा अनोखा अनुभव, तोंडवळी वरची शाळेतील उपक्रम

मालवण (प्रतिनिधी) - बालवयातच मुलांना शेतीची आवड निर्माण व्हावी, शेतीची विविध कामे, पिकांचे संरक्षण, आधुनिक शेतीची अवजारे, आधुनिक तंत्रज्ञान याबाबत ज्ञान व्हावे या उद्देशाने मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, तोंडवली वरची येथे 'बळीराजासाठी एक दिवस' हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास गावच्या सरपंच स्नेहा तोंडवळकर, हडी केंद्र तथा कोळंब केंद्राचे केंद्रप्रमुख प्रशांत पारकर सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, ग्रामपंचायत सदस्य मानसी चव्हाण व अनन्या पाटील, ग्रामस्थ बबली पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता परब, सहशिक्षिका सोनल कदम व विभा ठाकूर, तसेच पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी शेतकरी सुधीर पाटील व देवानंद पाटील यांच्या शेतीमळ्याला भेट दिली. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या, शेतीतील विविध कामांची माहिती जाणून घेतली तसेच शेतीमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनोखा अनुभव घेतला. विविध शेती अवजारे, पिकांची निगा, शेतीतील आधुनिक व पारंपरिक पद्धती यांची विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मौल्यवान ज्ञान मिळवले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी "गुडघा गुडघा चिखलात चिखलात" या गीतावर सादरीकरण करून उपस्थित शेतकरी बांधवांचा आनंद द्विगुणित केला. तसेच शेताच्या बांधावर सर्वांनी एकत्र बसून भोजनाचा आगळावेगळा आनंद घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आदर, कष्टाचे महत्त्व आणि बळीराजाबद्दल कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाली. शेवटी शेतकरी सुधीर पाटील व देवानंद पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg