loader
Breaking News
Breaking News
Foto

सिद्धयोग विधी महाविद्यालयातर्फे चिंचघर केंद्रीय शाळेत कायदे विषयक व्याख्यान संपन्न.

खेड - शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे शुद्ध योग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य कृती बोंद्रे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्यांच्या दायित्व उपक्रमाचे प्रमुख ऍडव्होकेट दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, नुकतेच चिंचघर दस्तुरी प्रभूवाडी केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत केंद्रीय शिक्षण परिषदेत ऍड दिलीप चव्हाण यांनी मिशन अभय अंतर्गत, ‘बाल लैंगिक प्रतिबंध कायदा’विषयी व्याख्यान दिले, त्याचप्रमाणे विद्यार्थी अक्षय चव्हाण, तानाजी चव्हाण, उबेद ऊल्ला आणि सेजल गोवळकर यांनी महिला संरक्षण कायदा व विद्यार्थी सुरक्षा कायदा या विषयी माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेचे मुख्याध्यापक नरेश ठोंबरे यांनी एवोकेट दिलीप चव्हाण यांचा शाल शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शिक्षण परिषदेला दस्तुरी गटातील सर्व शाळा शिक्षक ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. शिक्षक विनोद जाधव यांनी सूत्रसंचालन,सतीश गझल यांनी कार्यक्रमाची सुव्यवस्था पाहिली तर सूर्यकांत बेंद्रे यांनी उपस्थ्यांचे आभार मानले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg