सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयास आरोग्य निर्देशांकमध्ये कोल्हापूर परिमंडळात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. कोल्हापूर परिमंडळामध्ये कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे चार जिल्हे येतात. आरोग्य विभागाने आरोग्य निर्देशांक प्रमाणे मूल्यांकन केले असता, कोल्हापूर परिमंडळमध्ये उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. याबाबतची माहिती प्र. वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप सावंत यांनी दिली. ह्या निर्देशांकांमध्ये प्रामुख्याने रुग्णालयातील बाह्यरुग्ण संख्या, आंतररुग्ण संख्या, संस्थात्मक नॉर्मल आणि सिझेरियन प्रसूती, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, इतर मोठ्या आणि लहान शस्त्रक्रिया, रुग्णालयातील रोजची भरती असलेल्या रुग्णांची सरासरी संख्या अशा विविध निर्देशांकांची पाहणी केल्यानंतर हे मूल्यांकन केले आहे.
एप्रिल २०२६ ते जून २०२६ पर्यंत तीन महिन्यांत उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे एकूण बाह्यरुग्ण २५ हजार ६९२, आंतररुग्ण १ हजार ९०८, संस्थात्मक प्रसूती एकूण २०२, संपूर्ण लसीकरण ५४, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया २६, मोठ्या शस्त्रक्रिया १६९, लहान शस्त्रक्रिया ७४६, या व्यतिरिक्त २७४ रुग्णांची सोनोग्राफी, २ हजार १३५ रुग्णांची सीटी स्कॅन तपासणी, २ हजार ८३९ रुग्णांची एक्स रे तपासणी तसेच एकूण ४८ हजार ७७१ रक्त चाचणी करण्यात आली. तसेच अतिरक्तदाबाचे १हजार ६९९ व ३३५ मधुमेही नव्याने शोधून उपचाराखाली आणण्यात आले. तसेच एकूण ४६८ रुग्णांचे डायलिसिस करण्यात आले. ६७४ रुग्णांची नेत्रा तपासणी करून, त्यांना उपचार देण्यात आला. कोल्हापूर परिमंडळमध्ये ‘उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज’ प्रथम क्रमांकावर असून, तिसरा क्रमांक महिला व बाल रुग्णालय कुडाळचा आहे. तर सावंतवाडी द्वितीय क्रमांकावर असून, या कामगिरीसाठी सर्व स्तरांतून, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करण्यात येत आहे.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.