loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण शहरातील राहुल गार्डन रोड बांदल हायस्कूल समोरील खड्डे त्वरित भरा, अन्यथा उपोषण करणार - राजेश सुर्वे

चिपळूण (प्रतिनिधी) - चिपळूण शहरातील राहुल गार्डन रोड येथील बांदल हायस्कूलसमोर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक, प्रवाशी आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सदर रस्त्यामधून हायस्कूलमध्ये विद्यार्थी जात असताना खड्ड्यांतून वाहन गेल्यावर त्याचे पाणी थेट पादचारी आणि विद्यार्थ्यांच्या अंगावर उडत असल्याने विद्यार्थ्यातून प्रशासना विरोधात संतापाची लाट उसळली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत चिपळूण येथील अपंग कल्याण विभागाचे शहराध्यक्ष राजेश रामचंद्र सुर्वे वारंवार चिपळूण नगर परिषदमध्ये जाऊन प्रशासनाला सांगूनसुद्धा नगरपरिषद खड्डे भरण्याची तसदी घेत नाही, अशी माहिती सुर्वे यांनी पत्रकारांना दिली. सदरचे खड्डे त्वरित भरले गेले नाहीत तर नगरपरिषदेसमोर उपोषणासाठी बसावे लागणार, असे त्यांनी सांगितले. तरी याबाबत प्रशासन कोणती दखल घेते, याकडे संबंधितांचे लक्ष लागून आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg