loader
Breaking News
Breaking News
Foto

टिळक जन्मभूमीत डीजीकेच्या विद्यार्थ्यांनी सादर केला पोवाडा

रत्नागिरी(जमीर खलफे)- देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील, ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी ऐतिहासिक ‘टिळक जन्मभूमी’ येथे लोकमान्य टिळकांच्या जीवनकार्यावर आधारित खणखणीत पोवाड्याचे सादरीकरण केले. पोवाड्याच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी टिळकांचा स्वातंत्र्यसंग्राम, त्यांचा राजकीय व सामाजिक लढा आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, हा त्यांचा सिंहगर्जनायुक्त विचार उपस्थितांसमोर अत्यंत प्रभावीपणे मांडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्र. प्राचार्या ‘मधुरा पाटील’ यांनी टिळकांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. लोकमान्यांचे विचार आणि त्यांचे जीवनकार्य आजच्या युवा पिढीसाठी सदैव प्रेरणादायी राहील, असा संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी उपप्राचार्या वसुंधरा जाधव, इतिहास विभागप्रमुख प्रा. रिया बंडबे तसेच एनएसएस विभागप्रमुख प्रा. मिथिला वाडेकर उपस्थित होत्या.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात इतिहास विभाग व आयक्यूएसी विभागातर्फे महाविद्यालयात टिळकांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘गौरवी भरणकर’ हिने टिळकांच्या संघर्षमय जीवनावर गोष्ट सांगितली. या कार्यक्रमाला लोकमान्य टिळकांचे केसरी व मराठा या वृत्तपत्रातील लेखांचे भित्तिपत्रक प्रदर्शन लावण्यात आले. याचे उद्घाटन प्राचार्या मधुरा पाटील यांनी केले. यावेळी आयक्यूएसी समन्वयक प्रा. बावदाने, इतिहास विभागप्रमुख रिया बंडबे व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन स्वरांगी विचारे हिने केले. आर्या पावरी हिने आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg