loader
Breaking News
Breaking News
Foto

इयत्ता सहावीच्या ‘कलाशिक्षण’ पाठ्यपुस्तकाच्या विषय समितीच्या अध्यक्षपदी ए. जी. हायस्कुलचे ‘श्रीराम महाजन’ यांची निवड

चंद्रशेखर जोशी(दापोली) - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे यांनी प्रथमावृत्ती २०२६ साठी प्रकाशित केलेल्या इयत्ता सहावी ‘कलाशिक्षण’ या पाठ्यपुस्तकाच्या कला शिक्षण विषय समितीच्या अध्यक्षपदी दापोली एज्युकेशन सोसायटीच्या ए जी हायस्कुल दापोलीचे शिक्षक श्रीराम महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या विषय समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कला शिक्षण अधिक दर्जेदार, सर्जनशील आणि अनुभवाधारित पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी विविध तज्ज्ञांचा सहभाग घेण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या समितीमध्ये अजय पाटील, विनोद जांगळे, पांडुरंग देवळीकर, मिलिंद जाधव, गंगाधर तोपले, सुनील देसाई, धनाजी कराडे, उमेश डोंगे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना निमंत्रित सदस्य म्हणूनही समितीत स्थान देण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

बालभारतीच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्यकला आणि इतर कलांविषयीची आवड निर्माण होण्यास तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. श्रीराम महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेले हे पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांसाठी अधिक उपयुक्त, आकर्षक आणि गुणवत्तापूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. श्रीराम महाजन यांच्या या नियुक्तीबद्दल शिक्षण क्षेत्र, कला क्षेत्र तसेच विविध स्तरांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg