loader
Breaking News
Breaking News
Foto

थोर राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी

१ ऑगस्ट म्हणजेच आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” ही घोषणा देणारे लोकमान्य टिळक भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य नेते होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याची पायाभरणी करणाऱ्या अशा या थोर राष्ट्रपुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम!

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली येथे झाला होता. तर १ ऑगस्ट १९२० रोजी मुंबईमध्ये या महान स्वातंत्र्यसेनानी, विचारवंत आणि समाजसुधारकाचे निधन झाले होते. टिळक लाल-बाल-पाल या त्रयीतील एक, होम रूल लीगचे संस्थापक होते. तसेच त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारखे उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरे करून जनजागृती केली.

टाइम्स स्पेशल

'स्वराज्याचा मंत्र' देणारे महापुरुष : लोकमान्य टिळकांनी संपूर्ण देशाला "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" हा अजरामर मंत्र दिला.तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जनजागृती घडवून आणण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारच्या विरोधात तीव्र लढा दिला.केसरी (मराठी) आणि मराठा (इंग्रजी) ही दोन वृत्तपत्रे सुरू करून त्यांनी लोकांना आपल्या हक्कांची जाणीव करून दिली आणि इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी त्यांनी 'सार्वजनिक गणेशोत्सव' आणि 'शिवजयंती उत्सव' सार्वजनिक स्वरूपात साजरी करण्याची परंपरा सुरू केली.जनतेसाठी केलेल्या असीम त्यागामुळे आणि लढ्यामुळे भारतीय जनतेने त्यांना 'लोकमान्य' (म्हणजेच लोकांनी मान्य केलेला नेता) ही पदवी दिली. इंग्रजांनी त्यांना मंडालेच्या (म्यानमार) तुरुंगात डांबले असताना त्यांनी तिथे 'गीतारहस्य' हा अजरामर ग्रंथ लिहिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg