loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्ञानमंदिराला रंगोत्सवाची देणगी; पांगारी खापरेवाडी शाळेत ‘कमलाकर खापरे’ यांचा यथोचित सन्मान!

संगलट(खेड)(प्रतिनिधी)- शिक्षणाची पंढरी समृद्ध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे भावविश्व अधिक रंगीबेरंगी करण्यासाठी दानशूूर हातांची साथ नेहमीच मोलाची ठरते. याचाच प्रत्यय आज पांगारी तर्फे हवेली येथे आला. गावाची माती आणि नाळ जपणारे सुपुत्र सन्माननीय कमलाकर खापरे यांनी जि. प. शाळा पांगारी खापरेवाडी या ज्ञानमंदिराला तब्बल १०,००० किमतीचे रंग व सजावटीचे साहित्य देणगी स्वरूपात सुपूर्द केले. त्यांच्या या दातृत्वामुळे शाळेचे अंगण आता नव्या रूपात नटण्यासाठी सज्ज झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

‘सन्मान दातृत्वाचा’ या ब्रीदाला जागून, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने एक विशेष कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. शिक्षणाप्रती असणारी आस्था आणि गावाविषयीचे प्रेम यांबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय प्रविण खापरे आणि शाळेचे मुख्याध्यापक संदेश चव्हाण यांनी कमलाकर खापरे यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव केला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रविण खापरे यांनी मिळालेल्या या साहित्यामुळे बालकांचे बालपण आणि त्यांचे शिकण्याचे ठिकाण अधिक देखणे व बोलके होईल, अशा भावना व्यक्त केल्या आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने खापरे यांचे मनस्वी आभार मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg