loader
Breaking News
Breaking News
Foto

केंद्र शाळा खांबाळे येथे विशेष 'पाद्यपूजन सोहळा' व गुरुवंदन कार्यक्रम

वैभववाडी (प्रतिनिधी) - केंद्र शाळा खांबाळे येथे कृषी महाविद्यालय सांगुळवाडीच्या 'रावे' (RAWE) उपक्रमांतर्गत कृषीदूत विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विशेष 'पाद्यपूजन सोहळा' व गुरुवंदन कार्यक्रम अत्यंत भावूक आणि उत्साही वातावरणात पार पाडला. या कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीतील पवित्र 'गुरु-शिष्य' परंपरेचे यथोचित दर्शन घडले.​ या नंतर शालेय विद्यार्थी आणि कृषीदूत विद्यार्थ्यांनी एकत्र येत उपस्थित गुरुजनांचे पाद्यपूजन केले. तसेच शिक्षकांना श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि रोपे भेट देऊन त्यांचा सपत्नीक व यथोचित सन्मान करत आशीर्वाद घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी कृषीदूत विद्यार्थ्यांनी गुरुंचे मानवी आयुष्यातील स्थान, त्यांचे मार्गदर्शन आणि मूल्यांचे महत्त्व यावर आपले मनोगत व्यक्त केले. गुरु हे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे नसून जीवनाला योग्य दिशा देणारे शिल्पकार असतात, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. ​शाळेचे केंद्र प्रमुख चेतन बोडेकर आणि मुख्याध्यापिका जयश्री शेट्ये यांनी कृषीदूत विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. ​या सोहळ्यास उपशिक्षक हनुमंत सुतार यांच्यासह शाळेतील इतर शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

​या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन व सादरीकरण कृषी महाविद्यालय सांगुळवाडीचे कृषीदूत मानसिंग बेलेकर, विनायक घाटगे, योगेश जांभळे, अनिरुद्ध चौधरी, रामकृष्ण माने, सुनील गुत्तेदार, समीर मकानदार आणि रहीम तल्लुरी या विद्यार्थ्यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg