मसळा : जागतिक मानव तस्करी विरोधी दिनानिमित्त सामर्थ्य कल्याणकारी संस्था,यांनी बाल तस्करी रोखण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान सुरू करण्याची घोषणा केली आहे. जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेन या देशव्यापी नेटवर्कच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक बालक सुरक्षित राहावे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. संस्थेने सांगितले की, बाल तस्करी रोखण्यासाठी गावागावात जनजागृती, संशयित तस्करांची माहिती संबंधित यंत्रणांना देणे, गरजू व वंचित कुटुंबांची ओळख करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच मुलांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल. यासाठी पोलीस प्रशासन, महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागावर भर दिला जाणार आहे.
दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत देशभरातील ७८२ जिल्ह्यांमधील २५० हून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी २०३० पर्यंत बाल तस्करीविरोधात एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प केला. जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रेनच्या सहकार्याने एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत देशभरात १,२२,५१६ बालकांची तस्करीतून सुटका करण्यात आली आहे. यावेळी सामर्थ्य कल्याणकारी संस्थेचे संचालक रंजिता पवार म्हणाल्या की, बाल तस्करी ही समाजासमोरील अत्यंत गंभीर समस्या आहे. अनेक गरीब कुटुंबांतील मुलांना नोकरी, शिक्षण किंवा चांगल्या जीवनाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जाते. त्यानंतर त्यांना बालमजुरी, भीक मागणे, लैंगिक शोषण किंवा इतर प्रकारच्या शोषणात ढकलले जाते.
ते पुढे म्हणाल्या की, बाल तस्कर अनेकदा आपल्या आसपासचेच असतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. कोणतेही मूल संशयास्पद परिस्थितीत दिसल्यास किंवा बाल तस्करीची शंका आल्यास त्वरित संबंधित प्रशासनाला माहिती द्यावी. समाजाच्या सहभागाशिवाय बाल तस्करी पूर्णपणे थांबविणे शक्य नाही. संस्थेने जिल्ह्यातील नागरिक, ग्रामपंचायती, शाळा, युवक मंडळे, महिला बचत गट आणि सर्व शासकीय विभागांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. "प्रत्येक बालक सुरक्षित, शिक्षित आणि सन्मानाने जगले पाहिजे" हा या अभियानाचा मुख्य संदेश असल्याचे संस्थेने स्पष्ट केले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.