सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि आगामी १५ ते २० वर्षांचा विचार करून शहरात नवे पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि शहरातील प्रमुख नागरिक, लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन व व्यापारी संघटनांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या नव्या पार्किंग धोरणाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. या नव्या धोरणानुसार शहरात उघड्यावर कुठेही चारचाकी वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली असून, दुचाकी, तीन आसनी व सहा आसनी रिक्षांसाठी स्वतंत्र पार्किंग झोन निश्चित करण्यात आले आहेत. बैठकीत बोलताना नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले म्हणाल्या, "शहरातील लोकसंख्या आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यापूर्वी २०१२ मध्ये पार्किंग धोरण लागू करण्यात आले होते. मात्र, आता शहराची संरचना बदलल्याने नव्याने नियोजन करणे गरजेचे झाले आहे." सभापती प्रतीक बांदेकर यांनी या नव्या पार्किंग आणि नो-पार्किंग मसुद्याचे वाचन केले. शहरात विठ्ठल मंदिर ते अर्बन बँक, हॉटेल तारा ते चोडणकर दुकान, बँक ऑफ इंडिया समोरील गटारावरील स्लॅब, राजवाडा ते शिवप्रसाद लॉज, नगरपरिषद समोर ते सारस्वत बँक, आर. पी. डी. हायस्कूल रस्ता, उभा बाजार, गांधी चौक ते चर्च मेन रोड, तसेच प्रीतम ऑटोमोबाईल्स नाल्यावर, आत्मेश्वर मंदिराशेजारी व वृद्धाश्रमाच्या बाजूला चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
शहरात येणाऱ्या खाजगी बसेससाठी जिमखाना मैदान प्रवेशद्वाराजवळ (पेड पार्किंग), निर्माण भवन बांधकाम नजीकची जागा, सिमेंटरी ते हेल्पर रस्त्यालगत आणि उपराळकर देवस्थानजवळ जागा निश्चित केली आहे. तर मालवाहक वाहनांसाठी आदिनारायण मंगल कार्यालयासमोर पार्किंग व्यवस्था असेल. शहरात गांधी चौक कारंजाभोवती (१५ रिक्षा), जुने न्यायालय इमारत (५ रिक्षा), चर्च बाजूने (५ रिक्षा), जयप्रकाश चौक ते महावितरण कार्यालय, नगरपरिषद गेट ते सुरभी आणि वृद्धाश्रमाजवळ (५ रिक्षा) अशा विविध ठिकाणी रिक्षांसाठी ठराविक संख्या निश्चित करून जागा देण्यात आली आहे. सहा आसनी रिक्षांसाठी जुना उपक्रम नाका येथे जागा दिली आहे. शहरात 'गांधी चौक ते जनता मेडिकल' आणि 'संचयनी ते पॅलेस रोड' हे मार्ग वन-वे (एकतर्फी) करण्यात आले आहेत. सर्व शाळांच्या प्रवेशद्वाराजवळ गतीरोधक (रंब्लर्स) बसवणे, मुख्य चौकांत झेब्रा क्रॉसिंग करणे आणि शहरातील सर्व पदपथांवर (फूटपाथ) 'नो पार्किंग' घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीदरम्यान सुधीर पराडकर, अभय पंडित, राजू मसूरकर,राजेश पनवेलकर, रवींद्र प्रभु , सुधीर आरीवडेकर, आनंद नेवगी व सिद्धार्थ भांबुरे आदींनी विविध महत्त्वाच्या सूचना मांडल्या. शहरातील एसटी बस स्थानक २५ मीटर क्षेत्रात नो-पार्किंगची कडक अंमलबजावणी करावी, भाजी विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि व्यावसायिक इमारतींच्या मंजूर पार्किंगच्या जागेत दुकाने थाटल्यास कारवाई करावी, अशा मागण्या बैठकीत करण्यात आल्या. यावर बोलताना सभापती प्रतीक बांदेकर यांनी स्पष्ट केले की, ज्या पार्किंगच्या जागेवर दुकाने किंवा इतर अतिक्रमणे केली असतील त्यांच्यावर नगरपालिकेकडून कडक कारवाई केली जाईल.
या बैठकीस पोलीस निरीक्षक राजेंद्र मकदूम, एसटी आगार व्यवस्थापक गौतमी कुबडे, परिवहन अधिकारी संकेत चोमनमी सभापती आनंद नेवगी, सभापती दिपाली भालेकर, सभापती सुधीर आडीवरेकर, सभापती प्रतिक बांदेकर, नगरसेवक तौकीर शेख, निलम नाईक, दुलारी रांगणेकर, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, अजय गोंदावळे, मोहीनी मडगावकर, सुनिता पेडणेकर, सुकन्या टोपले, रिक्षा युनियनचे सरचिटणीस सुधीर पराडकर, व्यापारी संघटनेचे जगदीश मांजरेकर, पुंडलिक दळवी, बाळ बोर्डेकर, श्रीपाद चोडणकर, सहा आसनी व तीन आसनी रिक्षा युनियनचे पदाधिकारी, टेम्पो संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच पुंडलिक दळवी, सतीश नार्वेकर, विशाल सावंत, दत्ताराम सावंत, संदेश परब, मदन गावडे व मान्यवर उपस्थित होते.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.