loader
Breaking News
Breaking News
Foto

अमरधाम स्मशानभूमीच्या प्रश्नावर पनवेल महापालिकेत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा; स्थलांतराच्या चर्चेला कडाडून विरोध

पनवेल : अमरधाम स्मशानभूमीतील नादुरुस्त शवदाहिनीमुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीचा मुद्दा पनवेल महापालिकेच्या महासभेत पुन्हा एकदा गाजला. या विषयावर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत स्मशानभूमीचे स्थलांतर किंवा बंद करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला तीव्र विरोध दर्शविला. शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले की, अमरधाम स्मशानभूमी हा मूळ पनवेलकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून, गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरपासून स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर नगरसेवकांनीही महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून शवदाहिनीच्या दुरुस्तीची आणि नवीन यंत्रणा बसविण्याची मागणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महापौर नितीन पाटील यांनीही या प्रश्नाची गंभीर दखल घेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अमरधाम स्मशानभूमीची पाहणी केली होती. त्यानंतर जुन्या शवदाहिनीचा वापर बंद करून नवीन अत्याधुनिक शवदाहिनी बसविण्याचा प्रस्ताव महासभेत चर्चेसाठी मांडण्यात आला. महासभेत बोलताना शिवसेनेच्या नगरसेवकांनी विषयपत्रिकेच्या गोषवाऱ्यात शिवसेनेच्या मूळ पाठपुराव्याचा आणि संबंधित पत्रव्यवहाराचा उल्लेख न केल्याबद्दल आक्षेप नोंदविला. श्रेयाचा मुद्दा नसून, शिवसेनेने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची अधिकृत नोंद महापालिकेच्या अभिलेखात असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी अमरधाम स्मशानभूमी स्थलांतरित किंवा बंद करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही शिवसेनेने कठोर भूमिका मांडली. कोणतेही नैसर्गिक किंवा तांत्रिक कारण पुढे करून स्मशानभूमीचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला. अमरधाम स्मशानभूमीच्या आधुनिकीकरणासह नागरिकांना सन्मानपूर्वक आणि अखंड सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेने यावेळी महापालिका प्रशासनाकडे केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg