loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ‘हर घर तिरंगा’ यात्रा ‘न भुतो न भविष्यती’ होणार

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : ‘हर घर तिरंगा... घराघरात तिरंगा, मनामनात राष्ट्रभक्ती!’ या भावनेने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची ‘हर घर तिरंगा यात्रा २०२६’ अभूतपूर्व आणि न भुतो न भविष्यती अशी साजरी केली जाणार आहे. या भव्य यात्रेचे आयोजन सोमवार, १० ऑगस्ट रोजी करण्यात आले असून, या संदर्भातील संघटनात्मक नियोजन बैठक सावंतवाडी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात उत्साहात पार पडली. ही बैठक अभियानाचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भाजप युवानेते विशाल परब, सावंतवाडी नगरपरिषद उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप आणि महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोमवार, १० ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १० वाजता सावंतवाडी येथील श्री देव उपरलकर मंदिर येथून या भव्य तिरंगा यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेत सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यांतील सुमारे ५ ते ६ हजार नागरिक, कार्यकर्ते व देशभक्त सहभागी होणार आहेत. हा सोहळा देशप्रेम आणि देशभक्तीने प्रेरित असा भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी सर्व स्तरांवर नियोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय सोहळ्यात नागरिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले. या नियोजन बैठकीस भाजपचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये जिल्हा संयोजक संदीप गावडे, युवानेते विशाल परब, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि दोडामार्ग माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस यांचा समावेश होता.

टाईम्स स्पेशल

याशिवाय सुधीर आडिवरेकर (सावंतवाडी मंडल अध्यक्ष), संतोष राऊळ (आंबोली मंडल अध्यक्ष), मधुकर देसाई (बांदा मंडल अध्यक्ष), दिपक गवस (दोडामार्ग मंडल अध्यक्ष), विष्णू परब (वेंगुर्ला मंडल अध्यक्ष), मोहिनी मडगावकर, हितेन नाईक, दिपाली भालेकर, प्रतिक बांदेकर, सुकन्या टोपले, सिद्धेश महाजन, अष्टविनायक धाऊसकर, सचिन शेट्ये, अंकुश नाईक, सुनील गवस, विनेश तावडे, दादा परब, सागर ढोकरे हे विविध आघाड्यांचे संयोजक व सहसंयोजक उपस्थित होते. ​तसेच सावंतवाडी नगरसेविका सुनीता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, निलम नाईक; वेंगुर्ला नगरसेवक विनय नेरुरकर, नगरसेविका गौरी माईणकर, गौरी मराठे; अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष पुंडलीक कदम, अल्पसंख्यांक सेल उपाध्यक्ष ड्युमिंग आल्मेडा, सावंतवाडी मंडल सरचिटणीस संतोष तळवणेकर, चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर, शिवा गावडे व केदार म्हसकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg