loader
Breaking News
Breaking News
Foto

मोरगाव बौध्दवाडी येथील महिला नातेवाईकांकडे जाते सांगून निघून गेली मात्र परतली नाही

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - कळणे येथील सिंधुदुर्ग बँकेत पैसे काढण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली महिला घरी परतली नाही. अमृता अमित कदम (३२, मोरगाव-बौद्धवाडी) असे त्या महिलेचे नाव असून तिचे पती अमित वामन कदम यांनी ती बेपत्ता झाल्याची फिर्याद येथील पोलीस ठाण्यात दिली आहे. वामन कदम (३९) यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे, दि. १० जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी अमृता कदम ही कळणे येथे बँकेत जाणार असल्याचे सांगून घरातून निघून गेली. त्यावेळी घरातील मुले शाळेत गेली होती, तर अमित कदम हे कामानिमित्त बाहेर गेले होते. संध्याकाळपर्यंत अमृता घरी न परतल्याने कुटुंबियांनी कळणे परिसरासह नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला; मात्र ती कुठेही आढळून आली नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेष म्हणजे घरातून जाताना तिने एक चिठ्ठी ठेवली असून, माझा शोध घेऊ नये, मी नातेवाईकांकडे जात आहे, असा उल्लेख त्यात करण्यात आला आहे. तरीदेखील तिचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. बेपत्ता महिलेची उंची अंदाजे ५ फूट, गोरा वर्ण, उभट चेहरा, लांब काळे केस, अंगात निळ्या रंगाची फुलांच्या नक्षीची साडी व निळा ब्लाउज, खांद्यावर गुलाबी रंगाची पर्स, गळ्यात मंगळसूत्र तसेच पायात निळ्या रंगाच्या स्लीपर चप्पल होत्या. ही महिला कोठेही आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg