loader
Breaking News
Breaking News
Foto

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या ऑटो पिकअप झोनमध्ये ‘उबर ऑटो’ सेवेला सुरुवात...!

नवी मुंबई (प्रतिनिधी)- नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयए) येथील ऑटो पिकअप स्टँडवर उबर ऑटो सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या सेवेमुळे विमानतळावर येणार्‍या आणि विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना टर्मिनलपासून पुढील प्रवासासाठी आणखी एक सोयीस्कर आणि सुलभ पर्याय उपलब्ध झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उबर ऑटो सेवा सुरुवातीला दररोज सकाळी ६.०० वाजल्यापासून मध्यरात्रीनंतर १.३० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. प्रवाशांची मागणी आणि सेवा संचालनाच्या गरजेनुसार भविष्यात या सेवेच्या वेळेत आढावा घेऊन ती २४ तास सुरू ठेवण्याचा विचार केला जाऊ शकतो.

टाईम्स स्पेशल

विमानतळावर सध्या उबर, ओला, रॅपिडो, अ‍ॅलाइट, ऑल माइल्स, एअरलिंक, डब्ल्यूटीआय तसेच इतर सेवा पुरवठादारांमार्फत दररोज मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कॅब सेवा उपलब्ध आहे. याशिवाय, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या भारत टॅक्सी या प्रीपेड टॅक्सी सेवेचाही नुकताच विमानतळावर शुभारंभ करण्यात आला आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना विमानतळावर ये-जा करण्यासाठी आणखी एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg