मालवण (प्रतिनिधी) - संपूर्ण जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणारी मसूरा एज्युकेशन सोसायटी ही एकमेव संस्था असावी. विध्यार्थ्यानी यशात सातत्य ठेवावे. आपल्या गावाचा अभिमान राखून शाळेबद्दल आत्मीयता बाळगा. तुमच्या यशामध्ये संस्था, शाळा आणि पालक यांचा मोठा वाटा आहे. हे यश तुमची अंतिम मंजिल नाही, तर ही एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. आज मिळालेला हा सन्मान तुम्हाला भविष्यात आणखी मोठे यश मिळवण्यासाठी, समाजाचा एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी आणि गावाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल. माजी विध्यार्थी संघ चांगला असलेल्या संस्थेला उत्तम भविष्य आहे, असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. दीपक परब यानी येथे केले.
मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कुल येथे जिल्ह्यातील व तालुक्यातील प्रथम दोन क्रमांक आणि मसूरे केंद्र गुणवंत विध्यार्थी यांचा रोख पारितोषिक देऊन वार्षिक गुणगौरव आणि शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब, उद्योजीका राधिका परब, विठ्ठल लाकम, प्रमोद खाडिलकर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, डॉ सुधीर मेहेंदळे, संजय बागवे, अर्चना कोदे, अरुण बागवे, प्रदीप भोगले, पंढरीनाथ नाचणकर, अप्पा परब, एस. आर. कांबळे, ज्ञानदेव पाटील, बाळू परब, राणे, उदय बागवे, सौ अभ्यंकर, शेखर बागवे आदी उपस्थित होते.
कै. मदन बागवे शिक्षण निधी आणि दात्यांच्या ठेवी मधून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकल कमिटी अध्यक्ष राजन परब यानी शुभेच्छा देताना मिळालेल्या पारितोषिकमागे पालक शिक्षक यांचे श्रम आहेत. पारितोषिक ही यशाची नवी सुरवात आहे, असे आवाहन केले. तर विठ्ठल लाकम म्हणाले, विध्यार्थ्यांच्या अभ्यासावर पालकांनी लक्ष द्यावे. यशासाठी कठोर परिश्रम करा असा सल्ला दिला. यावेळी बागवे हायस्कुल शिक्षक समीर नाईक यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने तर मानसी पेडणेकर, कुशल सावंत यांना होतकरू विध्यार्थि म्हणून बक्षीस देण्यात आले. यावेळी विश्वनाथ परब, शशांक पिंगुळकर, शहाजी चौगुले, रमेश पाताडे, विशाखा जाधव, समीर नाईक, आर्या भोगले, प्रगती मोरे, मंदार पाटील, सायली म्हाडगूत, भानुदास परब, अनिल मेस्त्री, हरी ठाकूर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दयानंद पेडणेकर, प्रस्ताविक मुख्या. मसुरेकर तर आभार एस. आर. कांबळे यानी मानले.












































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.