loader
Breaking News
Breaking News
Foto

वाभवे वैभववाडी नगरपंचायतमार्फत बाजारपेठेतील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजिकरण

वैभववाडी(प्रतिनिधी)- वाभवे वैभववाडी नगरपंचायतमार्फत बाजारपेठेतील भटक्या कुत्र्यांना पकडून निर्बिजिकरण करण्यास काल गुरुवारपासून सुरुवात केली. काल गुरुवारी व आज शुक्रवारी दिवसभर भटक्या कुत्र्याना पकडण्याची मोहिम युद्धपातळीवर सुरू होती. या पकडण्याच्या मोहिमेमुळे शहरातील नागरिकांकडून नगरपंचायतीच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेले अनेक महिने वैभवाडी शहरात भटक्या भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला होता. त्यामुळे शहरात रात्री व सकाळी नागरिकांना फिरणे मुश्किल झाले होते. त्यामुळे नागरिक या कुत्र्यांच्यामुळे भीतीच्या छाया खाली होते. गुरुवारी दिवसभर व आज शुक्रवारीही कुत्र्यांची धरपकड सुरूच होती. त्यामुळे वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या कामाबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या धरपकडेमुळे शहरातील कुत्र्यांचे प्रमाण कमी होणार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg