मालवण (प्रतिनिधी) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वकला, आत्मविश्वास आणि विचार मांडण्याची क्षमता विकसित व्हावी या उद्देशाने लायन्स क्लब मालवणच्या वतीने शैक्षणिक उपक्रम अंतर्गत फाटक शाळा, रेवतळे (मालवण) येथे शालेय वक्तृत्व स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत नीरजा हेमंत चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. भाविका धीरज सोनगत द्वितीय तसेच हार्दिक महेश दाभोलकर यांनी तृतीय क्रमांक तर उत्तेजनार्थ पारितोषिक समृद्धी कैलास माने, संचित कमलाकांत मसुरकर यांनी प्राप्त केले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष तथा मालवण नगरपरिषद बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, सेक्रेटरी पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, जेष्ठ सदस्या जयश्री हडकर, मुकेश बावकर, वैशाली शंकरदास, मनाली दळवी व अन्य लायन्स सदस्य तसेच शिक्षक देविदास नामदेव प्रभुगांवकर, महादेव श्रीहरी घोडके तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.
स्पर्धेतील सर्व पारितोषिक ज्येष्ठ लायन्स सदस्या जयश्री हडकर यांनी पुरस्कृत केली. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष आभार मानून कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वाची आवड, राष्ट्रपुरुषांच्या विचारांप्रती आदर आणि आत्मविश्वास जागविणारा हा उपक्रम लायन्स क्लब मालवणच्या सामाजिक, शैक्षणिक बांधिलकीचा आणखी एक आदर्श ठरला. उपस्थितांकडून क्लबच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.