loader
Breaking News
Breaking News
Foto

परचुरी येथील गणेश मूर्तिकार कलेतला उगवता तारा राजन चंदरकर

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - कोकणातील विविधतेने नटलेले परचुरी हे गाव कलेचे माहेरघर आहे. येथील निसर्गरम्य परिसर टूरिस्ट ना आकर्षित करतो. येथे नमन, जाखडी, टिपरी नृत्य, शाहिरी पेंटर, गायक, वादक असे लोक कलावंत अनेक आहेत. यापैकीच एक रंगकर्मी म्हणून नावाजले गेलेले व सध्याचे परचुरी या गावचे उपसरपंच व प्रभारी सरपंच श्री प्रदीप विश्राम चंदरकर यांचे सुपुत्र राजन प्रदीप चंदरकर एक युवा उदयोन्मुख कलावंत म्हणून नावाजलेले जात आहेत. राजन चंदरकर हे सध्या कॉलेजला असून आर्टडिग्री सेकंड इयर म्हणून शिक्षण घेत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वडील प्रदीप चंदरकर हे गेली 30 वर्ष प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत गुरुकृपा आर्ट चित्र शाळा सांभाळीत आहेत. वडिलांची कलेची आवड पाहून सुपुत्र राजन चंदरकर यांनाही कलेची आवड निर्माण झाली. मातीचे छोटे छोटे गणेश मूर्ती काढणे व रंगविणे अशी त्यांनी पाच वर्षांपूर्वी सुरुवात केली. श्रीमती वंदना चंदरकर (आजी )यांनी या दोघांनाही आधारस्तंभ म्हणून नेहमीच आतापर्यंत मार्गदर्शन केले आले. यंदा पंचवीस जुलैपासून कारखान्यात युवा कलाकार राजन प्रदीप चंदरकर यांनी रंग कलेला सुरुवात केली आहे व वडीलांकडून या कामात शिक्षणाचे व या जमान्यात नवनवीन कलेचे धडे देखील घेत आहेत. प्रदीप चंदरकर हे गेली अनेक वर्ष गोवा, पणजी येथे मोठमोठ्या इमारतीत आतील कलाकुसर,नक्षीकाम तसेच अनेक मंदिरातून मूर्तीची रंग कलेतून सजावट व रेखीवपणा इत्यादी कामे आकर्षक पणे करतात.

टाईम्स स्पेशल

सुविद्य पत्नी प्रणाली यांची अविरत साथ लाभत आहे. कारखान्यात एकूण 300 च्या आसपास गणेश मूर्ती आहेत. देवींच्या मूर्ती, सरस्वती देवीच्या मूर्ती व गौरीचे मुखवटे देखील रंगवले जातात व त्याच्यावर कलाकुसर केली जाते. आधुनिक रंग व मूर्तीतील विविधतेनुसार सध्या मुंबई पुणे आधी ठिकाणाहून मोबाईल व व्हाट्सअप यावरून गणेश मूर्तीची मागणी व निवड केली जाते. विशेषतः युवक वर्गातून ही मागणी होताना दिसते. कुरदुंडा, गाव मळा, कोळंबे, ओझरखोल, उक्षी, वांद्री आदी गावातून गणपती ना मागणी होत आहे. यंदाच्या वर्षी गणेशोत्सव चतुर्थीचा सण 14 सप्टेंबरला असल्यामुळे चित्र शाळेत कामाची लगबग दिसून येते. माझ्या कुटुंबाचा विकास ग्रामीण भागात याच कलेमुळे झाला आहे. असे मत गणेश मूर्तिकार प्रदीप चंदरकर यांनी व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg