loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मध्यभागी रस्त्यावरील खड्‌ड्याने नागरिक त्रस्त

वैभववाडी(प्रतिनिधी)- वैभववाडी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वैभववाडी शहराच्या मध्यभागी रस्त्यावर पडलेल्या खड्‌ड्यांचा त्रास हा केवळ वैभववाडी शहरातील नागरिकास होत आहे असे नाही तर तालुक्याच्या ग्रामीण भागातून वैभववाडी या ना त्या कामानिमित्त येणार्‍या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वैभववाडी तालुक्याचे मुख्यालय असणार्‍या वैभववाडी शहरात शहरासह ग्रामीण भागातील प्रवासी विद्यार्थी व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने ये जा करत असतात शहराच्या मध्यभागी एसटी स्टँडच्या समोर पडलेल्या खड्‌ड्यांचा त्रास विद्यार्थी नागरिक व प्रवाशांना होत असून या खड्‌ड्यांकडे प्रशासन दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

टाइम्स स्पेशल

शिक्षणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच विविध प्रकारची शासकीय आस्थापनांची कार्यालय असल्याने तेथे आपल्या शासकीय काही कामासाठी तसेच किराणा भाजीपाला मासळी चिकन मटन आधीच शेती विषयक अवजारे खरेदीसाठी बांधकामाचे साहित्य खरेदीसाठी वैभव शहरात त्याचप्रमाणे बँकेतील अनेक अशी कामे करण्यासाठी वैभववाडी शहरासह ग्रामीण भागातील लोक या शहरात रहदारी सुरू असते आणि शहराच्या मध्य ठिकाणी एसटी स्टँडच्या समोर पडलेल्या खड्‌ड्यांचा व खड्‌ड्यात साठलेले पाणी ये जात करणार्‍या वाहनांमुळे नागरिकांच्या अंगावर पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे तरी हे खड्डे नगरपंचायतीने तात्काळ दुरुस्त करून रस्ता व्यवस्थित करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg