loader
Breaking News
Breaking News
Foto

लोकमान्य चषक लांजा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रीराम विद्यालयाला घवघवीत यश.

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - नवयुग उत्कर्ष मंडळ भांबेड ( पेठ देव) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित व रीध्देश कन्ट्रक्शन, मुंबई पुरस्कृत यांच्यावतीने आयोजित लोकमान्य चषक लांजा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा १ ऑगस्ट २०२६ रोजी नवयुग उत्कर्ष युवक मंडळ भांबेड ( पेठदेव). येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांवर आधारित विषयांवर ही स्पर्धा प्राथमिक व उच्च प्राथमिक ( इयत्ता पाचवी ते आठवी), माध्यमिक व उच्च माध्यमिक ( इयत्ता नववी ते बारावी), आणि खुला गट अशा तीन गटात घेण्यात आली. स्पर्धेला तालुकास्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक ने घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेच्या खुल्या गटात श्रीराम विद्यालयाचे शिक्षक श्रुतीक सुशांत प्रभुलकर यांचा प्रथम क्रमांक आला असून त्यांना रोख रुपये दोन हजार प्रमाणपत्र व चषक त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात श्रीराम विद्यालय वेरवली च्या इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी समृद्धी दिगंबर साळस्कर हिला द्वितीय क्रमांक मिळाला असून तिला एक हजार रुपये रोख व प्रमाणपत्र व चषक . श्रीराम विद्यालयातील इयत्ता नववीतील पूर्वी सत्यवान राणे हिला उत्तेजनार्थ बक्षीस देऊन प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देण्यात आले या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

टाइम्स स्पेशल

श्रीराम विद्यालयाने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संचालक, विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, सर्व पालक, आजी माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदनचा वर्षाव केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg