मकरंद सुर्वे(संगमेश्वर)- संगमेश्वर येथील BSNL अर्थात भारत संचार निगम लिमिटेड टेलिफोन च्या एक्सचेंज इमारतीमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून लाखो रुपयांच्या किमतीच्या साहित्यावर डल्ला मारल्याची जोरदार चर्चा सध्या तालुकाभरात रंगली आहे. चोरट्यांनी इमारतीच्या दर्शनी भागाच्या दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला आणि चोरी केल्यानंतर जाताना तो दरवाजा तसाच उघडा-भगड सोडून पळ काढला, अशीही नवी चर्चा आता समोर येत आहे. ही घटना सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वी घडल्याची माहिती स्थानिक पातळीवर चर्चेतून व्यक्त केली जात आहे. मात्र, या संपूर्ण घटनेला अद्याप कोणत्याही यंत्रणेकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच या इमारती पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर, मुख्य रस्ता, सततची ये-जा आणि वर्दळीच्या वस्तीच्या ठिकाणी असलेल्या कसबा येथील प्रसिद्ध ’रफिक मार्ट’ मध्ये चोरीची मोठी घटना घडली होती. ऐन गर्दीच्या आणि मुख्य ठिकाणच्या दुकानात चोरट्यांनी डल्ला मारल्यामुळे या परिसरात आधीच घबराट पसरली आहे. हे ताजे प्रकरण शांत होत नाही तोच, आता सरकारी इमारतीत चोरीची चर्चा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कथित चोरीनंतर नेमके कोणते आणि किती किमतीचे साहित्य चोरीला गेले, तसेच इमारतीचे किती नुकसान झाले, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दर्शनी दरवाजा उघडा-भगड दिसल्याने संशय अधिक बळावला असून, या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, या संदर्भात संगमेश्वर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणी अद्याप कोणतीही लेखी किंवा अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याचे समजते. त्यामुळे जर प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोरी झाली असेल आणि चोरटे दरवाजा उघडा ठेवून पसार झाले असतील, तर बी एस एन एल प्रशासनाने अद्याप पोलिसांत धाव का घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तक्रार दाखल करण्यात काही तांत्रिक अडचणी आहेत की प्रशासनाकडून अंतर्गत पडताळणी सुरू आहे, याबाबतही तर्क लढवले जात आहेत. दरम्यान, एक्सचेंज इमारतीत किंवा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत का? आणि असल्यास त्या फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढता येईल का? याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणावर बी एस एन एल स्थानिक प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात चोरी झाली आहे? की ही केवळ अफवा आहे?, यामागचे सत्य बी एस एन एल प्रशासन आणि पोलिसांच्या अधिकृत भूमिकेनंतरच स्पष्ट होणार आहे.
.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.