खेड - शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे संस्थापक, शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री माननीय रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगे येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत भव्य वृक्षारोपण मोहीम आणि आंतर-वर्गीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाचे औचित्य साधून सकाळी संस्थेच्या वतीने प्रशालेच्या परिसरामध्ये विविध जातींच्या वृक्षांची वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली.
यामध्ये सिसम, साग, उंबर, आवळा, जांभूळ, करंज, वड यांसारख्या ५०० हून अधिक सावली देणाऱ्या व बहुगुणी वृक्षांची लागवड प्रशालेचे कमांडंट श्रीकिशन यादव, प्राचार्य डॉक्टर खोत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आली. केवळ झाडे न लावता, ती जगवण्याचा आणि त्यांच्या संगोपनाचा संकल्प सर्वांनी यावेळी घेतला. दुपारच्या सत्रात प्रशालेमध्ये व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सहावी ते नववी या लहान गटामध्ये इयत्ता आठवीचा संघ विजयी झाला. तर दहावी ते बारावी या मोठ्या गटांमध्ये इयत्ता अकरावीचा संघ विजयी झाला. विजयी संघास पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, कमांडंट, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्था कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.










































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)









































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.