loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांतून बल्लाळ गणेश देवस्थान परिसर प्रकाशमय; पर्यटन विकासाला मिळणार गती

प्रभानवल्ली (सागर गोवळे) : ग्रामीण यात्रा स्थळ विकास योजनेअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षात प्रभानवल्ली येथील प्रसिद्ध बल्लाळ गणेश देवस्थान परिसरात हायमस्ट लाईट्स बसवण्यात आले आहेत. आमदार किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि पंचायत समिती सदस्य दादा पत्की यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. याबद्दल बल्लाळ गणेश देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने लोकप्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​मंदिर परिसराच्या सर्वांगीण कायापालटासाठी देवस्थान समितीने पुढील टप्प्यातील विकासकामांची आखणी केली आहे. यामध्ये खालील प्रमुख सुविधांचा समावेश आहे: ​मंदिर परिसर अधिक नयनरम्य आणि स्वच्छ बनवणे, लहान मुलांसाठी खेळणी आणि मनोरंजनाची सोय, दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था, विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी भव्य सभागृह. ​या सर्व मागण्यांचे पत्र आमदार किरण सामंत यांना देण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत आवश्यक प्रस्ताव पर्यटन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत.

टाईम्स स्पेशल

खोरनिनको धरण, माचाळ, बल्लाळ गणेश देवस्थान आणि ऐतिहासिक विशाळगड ही प्रमुख ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने एकमेकांशी जोडल्यास या भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास माजी जिल्हा परिषद सदस्य तथा देवस्थानचे अध्यक्ष अमोल रेडीज यांनी व्यक्त केला. या विकासकांमांमुळे बल्लाळ गणेश मंदिर परिसराचे सौंदर्य अधिक खुलणार असून भाविकांची सोय होण्यासोबतच स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg