loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत संविधान सन्मान मंचाची भव्य ‘राष्ट्रसंरक्षण मूकपदयात्रा’

रत्नागिरी (जमीर खलफे): नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्याचे भांडवल करत देशात अराजकता माजवू पाहणार्‍या देशद्रोही वृत्तींचा तीव्र शब्दांत निषेध करण्यासाठी आज रत्नागिरी शहरात संविधान सन्मान मंचाच्या वतीने भव्य ‘राष्ट्रसंरक्षण मूकपदयात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. शांततेतून शक्ती, एकतेतून परिवर्तन असा ठाम संदेश देत या मूक पदयात्रेच्या माध्यमातून हजारो राष्ट्रप्रेमींनी एकत्र येत आपला रोष व्यक्त केला. सकाळी शहरातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मूकपदयात्रेला सुरुवात झाली. अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण मार्गाने ही पदयात्रा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. हा संपूर्ण परिसर ’राष्ट्रप्रथम’ या भावनेने आणि देशभक्तीच्या वातावरणाने व्यापून गेला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg