देवरुख (सुरेश सप्रे) तालुक्यातील मौजे कुटगिरी (येडगेवाडी), ता. संगमेश्वर येथील खाजगी जमीनमालक व शेतकऱ्यांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीत लेखी संमतीशिवाय पाण्याची पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न केला सुरू आहे, परंतू सार्वजनिक विहिरीतून गावाला पाणीपुरवठा करण्यास त्यांचा कोणताही विरोध नाही. प्रत्येक नागरिकाला शाश्वत व कायदेशीर पद्धतीने स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे, मात्र, जमीनमालकांची लेखी संमती न घेता आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता त्यांच्या खाजगी मालकीच्या जमिनीतून पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न होत असल्याने त्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. असा आरोप करत त्यांनी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनाही माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी देण्यात आल्या आहेत.
निवेदनानुसार, येडगेवाडीची लोकसंख्या सुमारे ७५० पेक्षा अधिक असून जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे ₹१ कोटी ३७ लाख खर्चाची नळपाणी योजना मंजूर करण्यात आली आहे. काही व्यक्तींनी या योजनेलाच विरोध केल्यामुळे ती दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याचा दावा करण्यात आला आहे. परिणामी, अनेक ग्रामस्थांना आजही सार्वजनिक विहिरीतून डोक्यावरून पाणी वाहून न्यावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी निवेदनात पुढे असा आरोप केला आहे की, सध्या पाईपलाईनसाठी आग्रह धरणाऱ्या चार कुटुंबांना यापूर्वी वडिलोपार्जित सुमारे २० गुंठे जागेचा तात्पुरता व विनामूल्य वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, सध्या त्यांची घरे संबंधित जमिनीत अतिक्रमित स्वरूपात असल्याचे निदर्शनास आले असून, अशा परिस्थितीत पुन्हा त्याच खाजगी जमिनीतून पाईपलाईन टाकण्याचा आग्रह धरणे अन्यायकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध असतानाही केवळ चार कुटुंबांच्या वैयक्तिक सोयीसाठी जाणीवपूर्वक खाजगी जमिनीतूनच पाईपलाईन टाकण्याचा आग्रह धरला जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे हा प्रश्न संपूर्ण गावाच्या पाणीपुरवठ्याचा नसून काही व्यक्तींच्या वैयक्तिक हितसंबंधांशी संबंधित असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दि. ३० जुलै २०२६ रोजी पंचायत समिती, संगमेश्वर (देवरुख) कार्यालयासमोर प्रस्तावित आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणून खाजगी जमिनीतून पाईपलाईन टाकण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.










































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)













































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.