संगमेश्वर (प्रतिनिधी) - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना जि. प. मुचरी गटातर्फे शालेय विध्यार्थ्यांना वह्या, पेन आणि खाऊचे वाटप करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुचरी जि. प.गटातील जेष्ठ शिवसैनिक शरददादा बाईत यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संगमेश्वर उपतालुका प्रमुख प्रकाश घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुचरी पं. स. गणातील मुचरी नूतन, मुचरी गौळ, मुचरी घोटलकोंड, ते-र्ये नं. १ आणि ते-र्ये नं. २ या शाळामध्ये जावून शालेय विद्यार्थ्यांना वह्या, पेन आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपतालुका प्रमुख प्रकाश घाणेकर यांनी आपल्या मनोगतात बाळासाहेबांचे विचार आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पदावर असतानाचे कार्य विद्यार्थी वर्गापर्यंत पोहचवला. तसेच युवा वर्ग आजही ठाकरेच्या पाठीशी असल्याचे सांगितले. तर जेष्ठ शिवसैनिक शरददादा बाईत यांनी आपल्या मनोगतात आणि कोणतेही बॅनरबाजी अथवा बडेजावं न करता सामाजिक कार्य करत असल्याचे सांगितले. यावेळी २०% राजकारण आणि ८०% समाजकारण हे ब्रीदवाक्य असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज १००% समाजकारण करण्यासाठी आलेला आहे, असे देखील दाखवून दिले. यावेळी विद्यार्थी वर्गाच्या चेहऱ्यावरील आनंद सारे काही सांगून जात होत. याकार्यक्रमाला शरद दादा बाईत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी उपतालुका प्रमुख प्रकाश घाणेकर, जेष्ठ शिवसैनिक शरददादा बाईत यांच्या समवेत नावडी विभाग प्रमुख वैभव मुरकर, ते-र्ये शाळा उपाध्यक्ष आणि शाखा प्रमुख सतीश पवार, ते-र्ये गावचे उपसरपंच सुभाष सोलीम, निढळेवाडी बूथ प्रमुख अमोल वाडकर, मुचरी ग्रामपंचायत सदस्य बेनाडे, शालेय शिक्षक वर्ग, आदी शिवसैनिक उपस्थित होते.


































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.